पसायदान महाभारत : केंद्राभिमुख ‘कॉन्स्किओ’ शासनाचा अंत; केंद्रापसारी ‘रिकॉन्स्किओ’ चेतना-क्रांतीचा उदय!

पसायदान महाभारत : केंद्राभिमुख ‘कॉन्स्किओ’ शासनाचा अंत; केंद्रापसारी ‘रिकॉन्स्किओ’ चेतना-क्रांतीचा उदय!

 

विशेष प्रतिनिधी : पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे केवळ भक्तिमय प्रार्थना नसून २१व्या शतकातील मानवजातीसाठी चेतना-जागृतीचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान आहे. व्यक्ती, समाज, शासन आणि निसर्ग यांच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करून केंद्रापसारी, सर्वभूतहितवादी जीवनपद्धती स्वीकारण्याची ही वेळ असल्याचे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी केले.

 

ते म्हणाले की, आजचे महाभारत हे कुरुक्षेत्रावर नव्हे तर मानवी मेंदू, समाजशासन आणि निसर्गशासनाच्या अदृश्य रणभूमीवर सुरू आहे. या संघर्षाला त्यांनी “पसायदान महाभारत” असे संबोधले.

 

ॲड. गवळी यांच्या मते, इंटिग्रेटेड नॉलेज थिअरीच्या आधारे पसायदान ही मानवी मेंदूमधील स्वार्थ, अहंकार, लोभ, भ्रष्टाचार, जातीयवाद आणि पर्यावरणविनाशाला पोषक ठरणाऱ्या केंद्राभिमुख नॉन-जेनेटिक माहितीचे रूपांतर करून सर्वभूतहिताच्या केंद्रापसारी “रिकॉन्स्किओ” चेतनेकडे नेणारी प्रक्रिया आहे.

 

त्यांनी स्पष्ट केले की, महाभारतातील कौरव-पांडव हे केवळ ऐतिहासिक पात्र नसून मानवी मनातील दोन शासनप्रवृत्तींचे प्रतीक आहेत. “जे खळांची व्यंकटी सांडो” या पसायदानातील संदेशाचा अर्थ व्यक्तींचा नाश नव्हे, तर मनातील खळवृत्ती, लोभ, अहंकार आणि वर्चस्ववादी मानसिकतेचा संपूर्ण पराभव हा आहे.

 

पसायदानाचा खरा अर्थ मंदिरात केवळ पठण करण्यापुरता मर्यादित नसून पाणी अडवा-पाणी जिरवा, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष, समाजसेवा आणि सर्वभूतहितासाठी कृतीशील जीवन जगणे हा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

संविधान बाह्य न्यायव्यवस्था मजबूत करते, तर पसायदान अंतःकरणातील नैतिक क्रांती घडवते. या दोन्हींच्या समन्वयातून जातीयवाद, भ्रष्टाचार आणि पर्यावरणविनाशावर प्रभावी मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी संपूर्ण देशभर “रिकॉन्स्किओ चेतना-क्रांती” उभारण्याचे आवाहन करण्यात आले. “भारत जागो, चेतना जागो”, “जातिव्यवस्था मोडून काढा”, “भ्रष्टाचार जाळून टाका”, “सर्वभूतहिताचा मार्ग स्वीकारा” अशा घोषणांचा कार्यक्रमआहे .असे संघटनेच्या वतीने ॲड. कारभारी गवळी यांनी म्हटले आहे.

या निर्णायक आंदोलनासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड.अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले आणि प्रकाश गोसावी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील असून,या चेतना-जागृती अभियानात पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ॲड. कारभारी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, वकील, पत्रकार तसेच युवक स्वयंसेवक सक्रियपणे सहभागी झाले असून राज्यभर ही लोकचळवळ उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ