साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त पीपल्स हेल्पलाईनतर्फे अभिवादन

अहिल्यानगर | प्रतिनिधी/लोकशाही, सामाजिक न्याय आणि श्रमिकांच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज ठरलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, “अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित घटकांच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांच्या विचारांमध्ये समता, स्वाभिमान, शिक्षण, संघटन आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश आहे. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे आचरण करून अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची प्रेरणा घ्यावी.”

 

ते पुढे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला जागृत करणारे आणि परिवर्तनाची दिशा देणारे आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी सक्रियपणे कार्य करणे होय.

 

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला कृतज्ञ अभिवादन करण्यात आले असून, त्यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले.

लोकशाही, सामाजिक न्याय आणि श्रमिकांच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज ठरलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पीपल्स हेल्पलाईनचे कार्यकर्ते प्रकाश थोरात यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ