स्वराज्य अभियानाला नवी चालना; अभिजीत दिपके यांच्याशी माजी जलसंपदा अधिकारी इंजि. बाळासाहेब लांडे यांची स्वराज्य, STV मतदान पद्धतीवर चर्चा

“स्वराज्य हा प्रत्येक मतदाराचा जन्मसिद्ध हक्क आहे; आणि तो आपण सर्वांनी मिळून प्राप्त करायचाच आहे,”

अहिल्यानगर, प्रतिनिधी : स्वराज्य अभियानांतर्गत आज कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेऊन स्वराज्याची संकल्पना, पसंतीच्या प्राधान्यक्रमाने मतदान (STV) प्रणाली आणि खऱ्या संविधानिक प्रजासत्ताकाच्या निर्मितीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी स्वराज्य अभियानाची माहितीपर पुस्तिकाही त्यांना भेट देण्यात आली.

 

याप्रसंगी अभियानाचे प्रवर्तक, माजी जलसंपदा अधिकारी इंजि. बाळासाहेब धोंडीबा लांडे यांनी सांगितले की, देशातील प्रत्येक प्रामाणिक जनआंदोलनाने केवळ विरोधाची भूमिका न घेता लोकशाही अधिक सक्षम करणाऱ्या रचनात्मक पर्यायांवरही भर दिला पाहिजे. प्राधान्यक्रमाधारित मतदान (STV) पद्धतीमुळे लोकप्रतिनिधित्व अधिक व्यापक, न्याय्य आणि लोकाभिमुख होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

अभिजीत दिपके यांनी स्वराज्य अभियानाची पुस्तिका स्वीकारून अभियानाच्या उद्दिष्टांविषयी माहिती घेतली. यावेळी लोकशाही बळकट करण्यासाठी जनजागृती, मतदार शिक्षण आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

 

इंजि. लांडे यांनी विश्वास व्यक्त केला की, अभिजीत दिपके आणि देशातील जागरूक नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांतून स्वराज्याची संकल्पना अधिक व्यापक होईल आणि खऱ्या अर्थाने लोककेंद्री संविधानिक प्रजासत्ताक उभारण्याच्या दिशेने देश वाटचाल करेल.

 

यावेळी त्यांनी, “स्वराज्य हा प्रत्येक मतदाराचा जन्मसिद्ध हक्क आहे; आणि तो आपण सर्वांनी मिळून प्राप्त करायचाच आहे,” असा निर्धार व्यक्त केला. “संघर्ष योद्धा स्वराजा” या अभियानाच्या घोषवाक्यासह स्वराज्य जनजागृती अधिक व्यापक करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा; प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा! फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; थेट खरेदीने एक मुस्त रक्कम स्वीकार अथवा अन्य मार्गांनी दिलेल्या भूस्वामींनाही लाभ